CricketInspirational Sport storySachin Tendulkar
सचिन तेंडुलकर याच्याविषयी न ऐकलेल्या क्रिकेट गोष्टी
सचिन तेंडुलकर नावाचं गारूड अजूनही क्रिकेट-प्रेमींच्या मनात घर करून आहे.
त्याच्या लोकप्रियतेमागे अनेक गोष्टी दडलेल्या आहेत.
सचिनचा जन्म 24 एप्रिल, 1973 रोजी मुंबईत झाला.
शतकांचे शतक हा विक्रम एकमेव त्याच्या नावावर आहे.
सचिनच्या या वलयांकित क्रिकेट प्रवासात अनेक विक्रम आणि रहस्ये दडलेली आहेत. ती ऐकली तर तुम्ही थक्क व्हाल.
हे ऐकलंय का
- संगीतकार एस. डी. बर्मन यांच्या नावावरूनच सचिनचं Sachin Tendulkar | नाव ठेवण्यात आलं.
- सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांना क्रिकेट अजिबात आवडत नव्हते. असे असले तरी सचिनला क्रिकेट खेळण्यापासून त्यांनी कधी रोखले नाही.
- सचिन जेव्हा सात वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या बहिणीने त्याला बॅट भेट दिली होती.
- या बॅटकडे पाहूनच सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेट संघात जाण्याचं स्वप्न पाहत होता.
- सचिन तेंडुलकर याला Sachin Tendulkar | झोपेत चालण्याची सवय आहे. त्याचबरोबर झोपेत तो बडबडतही असतो.
- शाळेत मित्र अतुल रानडे याने सचिन मुलगीच वाटला होता. कारण बालपणी सचिनचे केस मोठे आणि कुरळे होते.
विनोद कांबळीसोबतची ती ऐतिहासिक खेळी…
- विनोद कांबळीसोबत त्याने ऐतिहासिक धावसंख्या उभारली तेव्हा ते दोघेही सहाय्यक प्रशिक्षकाशी नजरानजर करीत नव्हते. कारण प्रशिक्षक डाव घोषित करणार होते. तेच सचिन आणि विनोदला नको होते. त्या दोघांना फक्त खेळायचे होते. त्यामुळे ते गाणे गाऊन आणि शिटी वाजवूनच एकमेकांशी संवाद साधत होते.
- टीव्हीवर जेव्हा गाइड चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा तो एका झाडावरून पडला होता. त्याचा भाऊ व प्रशिक्षक अजितने सचिन तेंडुलकर याला शिक्षा म्हणून क्रिकेट कोचिंग क्लासला पाठवले होते.
- बेडूक आणि गप्पी मासे पकडण्यासाठी सचिन Sachin Tendulkar | आपल्या साहित्य सहवास अपार्टमेंटजवळच्या एका तलावावर जात असायचा. एकदा तर त्याने बेडकाची भाजी कशी करतात याची रेसिपी शोधून काढण्यासाठी आईकडे हट्टच धरला होता.
- सचिन चेष्टामस्करी करण्यात पुढे असायचा. त्याने झोपलेल्या सौरव गांगुलीच्या खोलीत पाणी सोडले होते. सौरवला तो बाबू मोशाय म्हणायचा, तर सौरव त्याला छोटा बाबू म्हणायचा.
मटामध्ये फोटो न आल्याने नाराज…
- वयाच्या 13 व्या वर्षी पेपरमध्ये फोटो छापला नव्हता म्हणून सचिनचं मन खट्टू झालं होतं. मुलाच्या हट्टामुळे त्याच्या वडिलांनी आपल्या मित्राला यामागचं कारणही विचारलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्सच्या रविवारच्या अंकात एका विशेष स्तंभलेखनात त्याचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला. या स्तंभात सचिनचाही फोटो होता. सचिनचं वय त्या वेळी फक्त 13 वर्षांचं होतं. हा अंक अजूनही त्याचा भाऊ अजित तेंडुलकर यांनी जपून ठेवला आहे.
- टेनिसविश्वातला एकेकाळचा स्टार खेळाडू जॉन मॅकेन्रो हा सचिनचा आवडता खेळाडू आहे. तो मॅकेन्रोचा इतका चाहता होता, की जॉनसारखेच त्याने डोक्याचे केस वाढवत त्याची चोटी घालत होता. मित्र सचिनला मॅकेन्रो म्हणूनच हाक मारत असे.
वयाच्या 14 व्या वर्षी अर्धशतक…
- वयाच्या 14 व्या वर्षीच सचिन तेंडुलकर याने गाइल्स शील्ड क्रिकेट स्पर्धेत अर्धशतकी खेळी साकारली होती. त्या वेळी पंच होते गोंधळकर सर. त्यांनी रमाकांत आचरेकरांना फोन करून सांगितले, की सचिन एक दिवस कसोटी क्रिकेट खेळेल. एका छोट्याशा खेळीवर गोंधळकर सरांचं आकलन खरं ठरलं, पण सचिनला ते कसोटी खेळताना पाहू शकले नाहीत. तत्पूर्वीच त्यांचं निधन झालं.
वेगवान गोलंदाजी करण्याचं होतं स्वप्न, पण…
- सचिनचं स्वप्न होतं, की वेगवान गोलंदाज बनावं. 1987 मध्ये डेनिस लिलीच्या एमआरएफ फाउंडेशनने सचिनला अपात्र ठरवलं. डेनिस लिली त्याला म्हणाले, तू तुझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित कर. नंतर सचिनने शास्त्रशुद्ध फलंदाजी केलीच, शिवाय उत्तम फिरकी गोलंदाजही बनला. त्या वेळी त्याचं वय होतं फक्त 14 वर्षे.
- सचिनच्या फलंदाजीतलं वैशिष्ट्य म्हणजे त्याने गोकुळाष्टमी, रक्षाबंधन, होळी आणि दिवाळीसारख्या सण-उत्सवांमध्ये नेहमीच मोठी धावसंख्या रचली आहे.
- विनोद कांबळी, सलील अंकोला यांच्यासोबत सचिन एक स्पर्धा खेळायचा, ती म्हणजे वडापाव खाण्याची.
- सचिनला मासे खूप आवडतात. आता त्याचेच स्वतःचे हॉटेल आहे.
- सचिन नेहमीच डावा पायाचा पॅड आधी बांधतो. त्याच्या मनातला तो एक तोटका आहे. त्याला असे वाटते, की असे केल्याने तो चांगली फलंदाजी करू शकतो. त्याची जी किट बॅग आहे त्याच्या आत त्याने तिरंगा ध्वज रेखाटला आहे.
- सचिन तेंडुलकर याने रणजी, दिलीप ट्रॉफी, इराणी ट्रॉफी या प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धांमध्ये पहिल्याच सामन्यात शतक झळकावले आहे.
- सचिनची गणपतीवर अपार श्रद्धा आहे. जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा तो सिद्धिविनायक मंदिरात हमखास जातो.
- सचिन तेंडुलकर याची क्रिकेट खेळावरील निष्ठा इतकी घट्ट आहे, की त्याला आपण कसे आउट झालो हे अजूनही आठवते. एवढेच नाही, तर कोणत्या गोलंदाजाने आउट केलं हेही तो लगेच सांगू शकतो.
- सचिनला Sachin Tendulkar | आपल्यासारखीच एक सवय आहे, ती म्हणजे ग्लुकोजचे बिस्कीट चहामध्ये बुडवून खाण्याची. जर बिस्कीट चहात पडलं, तर चमचाने काढून ते खातो.
- सचिन दोन्ही हातांचा उपयोग सहजपणे करतो. उजव्या हाताने त्याला खेळताना तुम्ही पाहिलं आहेच, पण जेवतो, लिहितो डाव्या हाताने. अनेकदा त्याने डाव्या हातानेही चेंडू फेकला आहे.
- तुमचा विश्वास बसणार नाही, पण मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर 1987 मध्ये झालेल्या भारत विरुद्ध झिम्बाब्वे क्रिकेट सामन्यात सचिन तेंडुलकर बॉलबॉय होता.
वकार युनूस विरुद्ध सचिन
[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=a69nlIkIkpE&t=38s” column_width=”4″]- सचिनने 15 नोव्हेंबर 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या वेळी भारतीय संघाचा पाकिस्तान दौरा होता. सचिनचं वय होतं 16 वर्ष 205 दिवस. पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खान, तर भारताचा कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत होता. या दौऱ्यात सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथसारखे स्टार खेळाडू भारतीय संघात होते. सचिन त्या वेळी आठव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला आणि 24 चेंडूंत 15 धावा करून वकार युनूसच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. याच सामन्यात सचिनने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतला पहिला चेंडू वकारचाच खेळला. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातला वकारचाही तो पहिलाच चेंडू होता. गंमत म्हणजे दोघांचाही तो पदार्पणातला पहिलाच सामना होता. वकार युनूस त्या वेळी 18 वर्षांचा होता. पदार्पणातच त्याने भारताचे 4 गडी बाद केले होते.
- पाकिस्तानविरुद्ध 15 नोव्हेंबर 1989 मध्ये सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या वेळी भारताकडून कसोटी खेळणारा तो 187 वा खेळाडू होता.
- सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar | एकदा क्रिकेट दौऱ्यासाठी एअरपोर्टला आपल्या बीएमडब्लू कारने जात होते. अचानक कार पंक्चर झाली. सचिनने कार तेथेच उभी केली आणि टॅक्सी पकडली, तर दुसरीकडे अजित तेंडुलकर त्याचं सामान घेऊन रिक्षाने एअरपोर्टवर पोहोचला.
- सचिनला आधी डावाची सुरुवात वेगाने करण्याची सवय होती. त्यामुळे तो बादही पटकन व्हायचा. त्या वेळी राजसिंग डुंगरपूर यांनी त्याच्या वडिलांना गमतीदार सल्ला दिला, की सचिनला सांगा, कार पहिल्या गीअरवर स्टार्ट करावी, पाचव्या गीअरवर नाही.
हळवा प्रसंग…
- वडिलांना मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्या वेळी सचिन श्रीलंकेत होता. मात्र, सचिनपासून ही घटना जाणीवपूर्वक दडवून ठेवली. त्यामुळे सचिन निर्धास्तपणे खेळू शकला आणि वडिलांच्या हृदयविकाराच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी त्याने शतकी खेळी साकारली.
- ऑक्टोबर 1995 मध्ये सचिन तेंडुलकरने वर्ल्डटेलसोबत पाच वर्षांसाठी 31.5 कोटी रुपयांचा करार केला होता. यामुळे सचिन विश्वातला सर्वांत श्रीमंत क्रिकेटपटू बनला.
- सचिनच्या फेरारी कारची चर्चा आजही होते. पण तुम्हाला माहीत नाही, की सचिनची पहिली कार मारुती-800 होती.
- थर्ड अंपायरच्या निर्णयावर बाद होणारा सचिन पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमध्ये 1992 मध्ये झालेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जाँटी ऱ्होड्सने आउट केले होते. तिसऱ्या पंचांनी सचिन आउट असल्याचा निर्णय दिला.
- एका सॉफ्ट ड्रिंकच्या एका जाहिरातीत त्याला माश्या मारणाऱ्या प्लास्टिकच्या रॅकेटने चेंडू मारण्यास सांगितले होते. मात्र, त्याने असे करण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे मी क्रिकेटपेक्षा महान खेळाडू लोकांना वाटेल. त्यामुळे नंतर तो या जाहिरातीत स्टम्पने चेंडू फटकावताना दाखवले आहे.
- सचिनने 2011 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असती, पण दक्षिण आफ्रिकेचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी त्याला आधार देत खेळण्याची प्रेरणा दिली.
- सचिनच्या नावावर असाही विक्रम आहे, की संघ हरल्यानंतरही त्याला सहा वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे.
- सलग 185 वन-डे सामने खेळण्याचा विक्रम सचिनच्या Sachin Tendulkar | नावावर आहे.
- विदेशातील कसोटी सामन्यांत सर्वाधिक धावांचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. त्याने विदेशातील एकूण कसोटी सामन्यांत 8,705 धावा केल्या आहेत.
पाकिस्तानकडूनही खेळण्याचा प्रसंग…
- सचिनने भारताकडून खेळताना विक्रमांच्या राशी रचल्या असल्या तर हे बऱ्याच जणांना माहीत नाही, की सचिन पाकिस्तानकडूनही खेळला होता. 1987 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना तो पाकिस्तानकडून खेळला होता. त्या वेळी तो बदली खेळाडू म्हणून पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरला होता.
- पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सुनील गावस्कर यांनी सचिनला पॅड गिफ्ट केले होते. हेच पॅड घालून तो मैदानात उतरला होता.
- सचिन भारतातील एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याने राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, पद्मश्री, पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कार मिळविले आहेत.
- 1990 मध्ये सचिनने प्रथमच सामनावीराचा बहुमान पटकावला तेव्हा त्याला शॅम्पेनची बाटली गिफ्ट मिळाली होती. मात्र, ती उघडण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. कारण त्या वेळी त्याचे वय 18 वर्षांपेक्षा कमी होते.
- सचिन तेंडुलकरच्या नावावर वेगवेगळ्या 90 मैदानांवर खेळण्याचाही विक्रम आहे.
- सचिनने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 989 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळला आहे. यातील 141 खेळाडू भारतीय, तर 848 खेळाडू विदेशी होते.
सचिनला मिळालेले पुरस्कार
- 1994 : अर्जुन पुरस्काराने गौरव
- 1997-98 : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
- 1999 : पद्मश्री पुरस्काराने सन्मान
- 2014 : भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार
- 2008 : सचिन तेंडुलकरचा 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरव
- 2010 : भारतीय वायुसेनेतर्फे 2010 मध्ये सचिनला मानद ग्रुप कॅप्टनचा सन्मान
- 2011 : बीसीसीआयतर्फे सर्वश्रेष्ठ भारतीय क्रिकेटपटूचा पुरस्कार
- 2012 : काँग्रेस पक्षातर्फे 2012 मध्ये सचिन तेंडुलकरला राज्यसभेचे सदस्यत्व
सचिन तेंडुलकरची वनडे कामगिरी
- 463 : सर्वाधिक वन-डे सामने
- 02 : सर्वाधिक सामनावीर पुरस्कार
- 15 : सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार
- 22 वर्षे 91 दिवस : वन-डेची सर्वांत मोठी कारकीर्द
- 18,426 : सर्वाधिक धावा (463 सामने) (सरासरी 44.83)
- 49 : सर्वाधिक शतके
- 145 : अर्धशतके
- 18 वेळा : नर्व्हस नाइंटी (90 ते 99)
- 2,016 : सर्वाधिक चौकार. वनडेमध्ये सचिनने 2,016 चौकार ठोकले आहेत.
- 2,278 : वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा (45 सामने- 56.95 ची सरासरी)
- 06 : सचिनने 44 डावांत वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 6 शतके ठोकली आहेत.
- 673 : एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा (2003 मध्ये 11 सामन्यांत 61.18 ची सरासरी)
Read More : सचिनला बाद देणे ही मानवी चूक
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65,93″]
5 Comments