विम्बल्डन रद्द झाल्याने या तीन खेळाडूंच्या मनसुब्यावर पाणी
विम्बल्डन रद्द झाल्याने कोणाचे नुकसान?
विम्बल्डन रद्द झाल्याने तीन दिग्गज टेनिसपटूंना मोठा झटका असेल. ते म्हणजे रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स आणि व्हीनस विल्यम्स यांना. कारण या तिन्ही दिग्गज खेळाडूंची ही स्पर्धा कारकिर्दीतली अखेरची स्पर्धा ठरणार होती. किंबहुना ही स्पर्धा खेळूनच ते टेनिसविश्वातून निवृत्तीची घोषणा करू शकले असते. कारण फेडरर आणि सेरेना २०२१ च्या स्पर्धेपर्यंत वयाची चाळिशी गाठतील, तर व्हीनस 41 वर्षांची होईल. सेरेनाला कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल. कारण गेल्या वर्षी ती विजेतेपदाच्या लढतीत सिमोना हालेपकडून पराभूत झाली होती. असे असले तरी सेरेनाच्या नावावर आजही 23 ग्रँडस्लॅम आहेत आणि तिला ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टच्या Margaret Court | विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी केवळ एका ग्रँडस्लॅम किताबाची गरज आहे. इंग्लंडसारख्या हिरव्या गवताच्या कोर्टवर जिंकण्याच्या ईर्षेनेच ती खेळणार होती. दुर्दैवाने ही स्पर्धाच रद्द झाल्याने सेरेनाची आव्हानं आणखी खडतर झाली आहेत. उन्हाळ्यानंतर किंवा हिवाळ्यापूर्वी जरी या स्पर्धा आयोजित केल्या असत्या तरी त्यांची सायंकाळ मात्र तेवढी लांबणार नाही हेही तितकंच खरं आहे. विम्बल्डनमध्ये सर्वांत जास्त काळ सामना खेळून तो जिंकण्याचा विक्रम करणारा अमेरिकेचा जॉन इस्नर John Isner | उद्वेगाने म्हणाला, की विम्बल्डन रद्द होण्याचे वृत्त पचविणे काहीसे जडच जाईल. इस्नर एटीपी रँकिंगमध्ये 21 व्या क्रमांकावर आहे आणि अमेरिकी खेळाडूंमध्ये तो अव्वल स्थानी आहे. इस्नेरने 2010 मधील विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत फ्रान्सच्या निकोलस माहूटचा 11 तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या सामन्यात पराभव केला होता. हा सामना तीन दिवस सुरू होता, ज्यात पाचवा सेट 70-68 अशा गुणांवर संपुष्टात आला.
सबातिनी म्हणते, घरीच स्वस्थ राहा
करोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगभरातील स्पर्धा रद्द होत असल्याने टेनिसच्या स्पर्धाही त्याला अपवाद राहिल्या नाहीत. अशा स्थितीत जेव्हा विम्बल्डन स्पर्धा रद्द होण्याचे संकेत मिळू लागले तेव्हा अर्जेंटिनाच्या गॅब्रिएला सबातिनीलाही अस्वस्थ केले. एकेकाळची दिग्गज टेनिसपटू म्हणून गणलेली आणि माजी यूएस ओपनची विजेती असलेल्या ४९ वर्षीय सबातिनीलाही जाणीव झाली, की आता टेनिसची कोणतीही स्पर्धा होणे अशक्य आहे.
‘‘हे अतिशय निराशाजनक आहे. आपल्याला कोणालाही हे सांगता येत नाही, की ही महामारी केव्हा समाप्त होईल. कदाचित आपल्याला भविष्याचा विचार करायला आवडत असेल, पण आता तसा विचार करता येणार नाही. जगात सर्वत्र एकसारखी स्थिती आहे आणि अशा स्थितीत घरात राहणेच उत्तम आहे.’’
– गॅब्रिएला सबातिनी, माजी टेनिसपटू, अर्जेंटिना
विम्बल्डनचे प्रमुख रिचर्ड लुईस यांनीही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की 2020 मध्ये एकही टेनिस स्पर्धा होणे अशक्य आहे. हा अंदाज अवास्तव अजिबात नाही. सर्व काही लवकर सामान्य होईल याचीही कोणी शाश्वती देऊ शकणार नाही.
आयटीएफच्या अध्यक्षांनी स्वतःच्या वेतनात केली कपात
करोना विषाणूच्या संक्रमणामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. क्रीडाविश्वातही अनेकांचे रोजगार धोक्यात आले आहेत. अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) ITF | आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी अनेक उपाययोजनांची घोषणा केली. महासंघाचे अध्यक्ष डेव्हिड हगर्टी यांनी आपल्या वेतनातून ३० टक्के कपातीचीही घोषणा केली. एटीपी आणि डब्लूटीए स्पर्धा मार्च २०२० मध्येच निलंबित केल्या होत्या आणि आता विम्बल्डन स्पर्धाही रद्द झाल्याने १३ जुलै २०२० पर्यंत कोणतीही टेनिस स्पर्धा होण्याची कोणतीही शक्यता नाही. आयटीएफने तशाही अनेक स्पर्धा रद्दच केल्या आहेत. यात पुरुष चॅलेंजर टूर आणि महिला टेनिस टूरचाही समावेश आहे. अशा स्थितीत महासंघाने नोकऱ्या वाचविण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या.
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”90″]
It's a big loss for the Tennis world and hard luck for Roger Federer and William sisters.
This is the stage of many prestigious competitions. This is the loss of the entire sports world.