‘टाइम्स ऑफ इंडिया’चे प्रसिद्ध छायाचित्रकार शांतनू दास यांच्या कॅमेऱ्यातून आलेली ही बोलकी छायाचित्रे. फोटोग्राफीच्या निमित्ताने त्यांनी भारतभ्रमण केले असून, देशातील अनेक भागांत त्यांनी आतापर्यंत शेकडो छायाचित्रे टिपली आहेत. त्यांच्या अनेक छायाचित्रांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. अशीच काही निवडक पाच छायाचित्रे माझ्या ब्लॉग वाचकांसाठी….
5. प्रतिबिंब
काही छायाचित्रे खूप बोलकी असतात. हा फोटोही तसाच आहे. या फोटोवर काही सांगण्यापेक्षा हा फोटोच खूप काही सांगून जातो. नवरात्रोत्सवात एका दुर्गा मंडळातर्फे सुरू असलेल्या आरतीवेळी टिपलेले हे छायाचित्र. दुर्गामूर्तीचे प्रतिबिंब तेथील समईच्या तेलात पडलेय आणि एक चिमुकली हात जोडून आरतीत सहभागी झालीय. देव चराचरात आहे. शांतनू दास यांनी नेमकी हेच टिपले. शांतनू दास यांनी अनेक बोलकी छायाचित्रे टिपली आहेत. त्यापैकीच हे एक.
इंद्रवज्र
शांतनू दास यांनी इंद्रधनुष्याची अनेक बोलकी छायाचित्रे टिपली आहेत. मात्र असा गोलाकार इंद्रधनुष्य फार कमी वेळा दृष्टीस पडते. रिमझिम पाऊस पडल्यानंतर इंद्रधनुष्याचे हे सुरेख छायाचित्र. हा नजारा मंगोलियाच्या त्सोंजिन बोल्डोग येथे पाहायला मिळाला. त्याच वेळी एक महिला अश्वावरून सैरसपाटा करीत होती. केवळ इंद्रधनुष्याचा नजाराच नाही, तर या महिलेचीही छबी टिपताना छायाचित्रकाराने सुरेख टायमिंग साधला आहे. त्यामुळे हे छायाचित्र अधिक देखणे आणि बोलके झाले आहे. जो संपूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य आपल्याला दिसतो त्याला इंद्रधनुष्याला इंद्रवज्र असं म्हणतात. हा इंद्रवज्र क्वचितच पाहायला मिळतो. असा इंद्रवज्र नाशिकमध्ये 6 ऑक्टोबर 2019 रोजी प्रथमच पाहायला मिळाला होता. अर्धगोलाकृती इंद्रधनुष्य हा पूर्ण गोलाकृतीच असतो. मात्र, क्षितिजामुळे तो अर्धगोल दिसतो.
लोकसंगीतातील रायझिंग स्टार
शांतनू दास यांच्या कॅमेऱ्याने पारंपरिक कलेची अनेक बोलकी छायाचित्रे टिपली आहेत. हे त्यापैकीच एक. हळूहळू प्रत्येक बॉक्समधील दिवा प्रज्वलित होत जातो, तसतशी एकेक करीत विविध 36 मंगानियार गायकांची छबी उजेडात येते. या प्रत्येक बॉक्समध्ये गायक वाद्य घेऊन बसलेला पाहायला मिळतो. ते गातात अप्रतिमच, पण त्यांची बॉक्समधील छबीही तितकीच देखणी भासते. डोक्यावर फेटा व अंगात पांढऱ्या रंगाच्या पारंपरिक पोशाखातील या गायकांचे प्रकाशात आलेले हे छायाचित्र प्रत्यक्षाहुनि उत्कट भासतेय.
कोण आहे मंगानियार?
राजस्थानमधील हा एक मुस्लिम समाज आहे, ज्यांनी संगीत परंपरा जपली आहे. मंगानियार शास्त्रीय लोकसंगीतासाठी देशात प्रसिद्ध आहेत. हे लोक अक्षरशः संगीत जगतात. संगीताशिवाय ते जगूच शकत नाहीत, इतकं त्यांचे लोकसंगीताशी घनिष्ठ नातं आहे.
वाघोबा कुणामुळे गायब झाले?
वाघासारखे अंगावर काळेपिवळे पट्टे रंगवत केरळमधील थ्रिसूर येथील पुलीकली कलाकारांनी रस्त्यावर एका पारंपरिक सोहळ्यात आपल्या लोककलेचे प्रदर्शन सादर केले. पुलीकलींना कडुवकली म्हणूनही ओळखले जाते. केरळमध्ये ते आपली कला सादर करतात. विशेषतः ओणम या सणाच्या चौथ्या दिवशी म्हणजे नालम ओणम या दिवशी ते आपली कला सादर करतात. उडक्कू आण थाकील वाद्याच्या तालावर ते नृत्य करतात. वाघाच्या वेशभूषेत आलेल्या या कलाकारांना पाहताना उपहासात्मक एक प्रश्न आपसूक मनी येतो, मानवाच्या विचित्र वागण्यामुळेच वाघ जंगलातून गायब तर नसेल ना झाला..?
संथपणे वाहणारे पाणी… त्यात एका पक्ष्याची पिलासह टिपलेली छबी. किती बोलका हा फोटो!
About Shantanu Das
Shantanu Das
As a child, I was very fond of a prehistoric 120-format Agfa click 3 camera owned by my uncle. Every time we went out for a vacation, my uncle used to carry that magic lantern with him. As a little boy, I was never allowed to touch the camera and that only instigated my curiosity about the machine. God knows from where I got the idea that there is someone who lives inside a camera and creates the plants, hills, sunsets and human beings who always smile. Years later and much before I started freelance photography, the myth of a man who lives inside a camera was exposed, but the fantasy and magic that revolves around photography still lingers on… I’m now in the field of photography for the last 20 years and working in The Times of India Group as a Photojournalist.
SOLO PHOTOGRAPHY EXHIBITION
Glimpses of Mongolia, at Tao Art Gallery, Mumbai, November 2014
“Boarders in and out”, April 2013 in Mumbai
Udvada – A parsi village at Tao Art Gallery in Bombay on April 2012.
The Land of the Rising Sun (Subject was Japan) at Tao Art Gallery in Bombay on 12 th November 2009 to 22 nd November 2009
AWARD
MFI National Press Photo Award in 2012.
National Geographic Traveler Photography Award in 2011
MFI National Press Photo Award in 2011
Young portfolio award from Kiyosato Museum of Photographic Arts, Japan for permanent collection on the theme Tiger Dance
Very goid
Very good
Thank you so much