All SportsFIFA WC 2018FIFA WC 2022sports news

बक्षीस समानतेचा लढा

बक्षीस समानतेचा लढा

टेनिस आणि गोल्फ यांसारख्या इतर खेळांमध्ये महिला आणि पुरुषांच्या बक्षीस रकमेतील तफावत बंद झाली असताना, फिफा त्यांच्या दोन विश्वचषकांसाठी असे करण्याच्या जवळपासही नाही.

बक्षीस रक्कम ठरवण्यामागे व्यापारी दृष्टिकोन आहे. स्पर्धेच्या एकूण कमाईवर बक्षीस रक्कम निश्चित केली जाते. सध्या पुरुषांच्या स्पर्धेत नफा अधिक असल्याने बक्षीस रक्कमही अधिक आहे.

मात्र, जसजसा महिलांचा खेळ अधिक लोकप्रिय होत जाईल, तसतसे येत्या काही वर्षांत हे अंतर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

“आज पुरुषांचा विश्वचषक महिला विश्वचषकासह सर्व फिफा स्पर्धांसाठी निधी पुरवतो. मात्र, आम्ही कमाईच्या बाबतीत नवीन ट्रेंड पाहिले आहेत,” असे फिफाच्या सरचिटणीस फात्मा समौरा नोव्हेंबर 2022 मध्ये म्हणाल्या होत्या.

जुलै 2022 मध्ये एबीसीशी बोलताना फात्मा समौरा म्हणाल्या होत्या, की “होय, आम्ही अजूनही पुरुषांच्या विश्वचषकाच्या बक्षीस रकमेपासून थोडे दूर आहोत. मात्र, आम्ही हेदेखील विचारात घेतले पाहिजे, की पुरुषांचा विश्वचषक जवळजवळ 100 वर्षांपूर्वी, म्हणजे 1930 मध्ये सुरू झाला. त्याच्या 61 वर्षांनी, 1991 मध्ये महिलांचा विश्वचषक सुरू झाला.

मे 2022 मध्ये, अमेरिकेच्या पुरुष आणि महिला संघांनी मान्य केले, की ते 2022 आणि 2023 मधील विश्वकपमध्ये जिंकलेली बक्षीस रक्कम समान पद्धतीने वाटून घेणार आहेत.

महिला चॅम्पियन बिली जीन किंगने स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्यानंतर 1973 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेत प्रथमच समान वेतनाची मागणी पुढे आली. ही मागणी पुढे आली त्याच्या फक्त एक वर्षापूर्वी किंगने विजेतेपदासाठी 10,000 डॉलर कमावले होते. ही रक्कम रोमानियाचा टेनिसपटू इली नास्टेस याच्या 25,000 डॉलर बक्षिसाच्या अवघी 40 टक्के होती.

म्हणजे अमेरिकन ओपनसारख्या एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत समान पुरस्कार देण्यासाठी तब्बल 28 वर्षे लागली.

ऑस्ट्रेलियन ओपनने महिला आणि पुरुष विजेत्याला 80 च्या दशकाच्या मध्यात आणि 90 च्या दशकाच्या सुरुवातीला समान बक्षीस रकमाची मागणी केली होती. टेनिस ऑस्ट्रेलियाच्या नोंदीनुसार महिलांना 1987 आणि 1988 मध्ये पुरुषांच्या तुलनेत थोडी अधिक रक्कम दिली गेली होती. मात्र, ही समानता काही वर्षांतच संपुष्टात आली. अखेरीस 2001 मध्ये समानतेसाठी कटिबद्ध असलेली ऑस्ट्रेलियन ओपन केवळ दुसरी स्पर्धा होती.

बऱ्याच कालावधीनंतर पुरस्कार समानतेच्या अनेक वर्षांनंतर फ्रेंच ओपनने 2006 मध्ये महिला आणि पुरुष विजेत्यांना समान बक्षीस रक्कम दिली.

हा पुरस्कार समानतेचा लढा इथपर्यंतच थांबला नाही. महिला टेनिस संघटनेच्या समर्थनामुळे अमेरिकेच्या आणखी एक टेनिस स्टार व्हीनस विल्यम्सने समानतेसाठी शेवटचा धक्का देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

व्हीनस विल्यम्सने 2006 मध्ये एका लेखात थेट प्रश्न उपस्थित केला होता. ती म्हणते, “2005 चा पुरुष विजेता रॉजर फेडररच्या तुलनेत विम्बल्डनने माझी चॅम्पियनशम्ची ट्रॉफीवर कमी बक्षीस ठेवण्याचा पर्याय का निवडला?”

या प्रश्नावर टीकाकारांचे उत्तरही ठरलेले असायचे. ते म्हणतात, की महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी बक्षीस दिले जाते, कारण ते कमी खेळतात. म्हणजे महिलांचे सामने बेस्ट ऑफ थ्री असतात, तर पुरुषांचे बेस्ट ऑफ फाइव्ह. मात्र व्हीनसने या तर्काला रोखठोक उत्तर देत सांगितले, की “2005 मध्ये विम्बल्डन स्पर्धेत महिलांचा अंतिम सामना पुरुषांच्या तुलनेत 45 मिनिटे अधिक वेळ चालला. तरीही त्याला कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही.”

व्हीनसने हा जो अंतिम धक्का दिला, त्याचा परिणाम असा झाला, की 2007 मध्ये जेव्हा हेच दोघे (विल्यम्स आणि फेडरर) विजेतेपदाच्या पोडियमवर आले, तेव्हा त्यांना समान बक्षीस देण्यात आले.

गंमत म्हणजे, 2015 च्या अमेरिकन ओपन स्पर्धेत व्हीनसची बहीण सेरेना अंतिम फेरीत पोहोचली, तेव्हा महिलांच्या अंतिम फेरीची तिकिटं पुरुषांच्या फायनलच्या आधी विकली गेली. हाच तो दुर्लभ क्षण होता, ज्या स्पर्धेत पुरुष आणि महिला या दोन्ही विजेत्यांना समान 3.3 मिलियन डॉलर बक्षीस रक्कम अदा करण्यात आली होती. ही समानतेची नांदी आता फुटबॉलमध्ये नुकतीच कुठे प्रवाहित झाली आहे.

ऑल इंग्लंड क्लबही झुकला

विम्बल्डन स्पर्धेत 2007 मध्ये पहिल्यांदा महिला टेनिसपटूला पुरुषांच्या बरोबरीची बक्षीस रक्कम मिळाली. जनतेचा दबाव आणि वूमेन टेनिस असोसिएशनच्या (WTA) इच्छेपुढे ऑल इंग्लंड क्लबलाही झुकावे लागले.

अमेरिकन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपनने अनेक वर्षांपासून बक्षिसात लिंगसमानतेचा पुरस्कार केला. फ्रेंच ओपननेही 2006 मध्ये प्रथमच पुरुष आणि महिला विजेत्यांना समान बक्षीस दिले होते. हे समानतेचं वारं विम्बल्डनभोवतीही घोंगावत होतं. मात्र, ऑल इंग्लैंड क्लब ऐकायलाच तयार नव्हता. त्यांनी बक्षिसातली लिंगसमानतेला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांचा एकच तर्क होता, की पुरुष गट बेस्ट ऑफ फाइव्ह सेटची स्पर्धा खेळतो. याउलट महिला गटात फक्त बेस्ट ऑफ थ्री सेट होतात.

ऑल इंग्लंड क्लबचे अध्यक्ष टिम फिलिप्स यांनाही अखेर बक्षीस रकमेतील समानतेला मान्यता द्यावी लागली. ते म्हणाले, “आशा आहे, की ही समानता नव्या पिढीतल्या मुलींनाही प्रोत्साहित करेल, ज्यांना या खेळात करिअर करायचे आहे. थोडक्यात म्हणजे, हे टेनिससाठी आणि विम्बल्डनसाठीही चांगले आहे. जेव्हा 1968 च्या विम्बल्डन स्पर्धेच्या एकेरीत रॉड लेवर याने 2,000 डॉलर जिंकले होते, त्या वेळी महिला एकेरीतील विजेती बिली जीन किंग हिला 750 डॉलरचे बक्षीस मिळाले होते. त्या वेळी ही रक्कम पुरुषांच्या रकमेपेक्षा केवळ 37.5% होती. अनेक वर्षांपासून आम्ही महिलांच्या बक्षिसात उत्तरोत्तर वाढ केली आहे. 2006 मध्ये विजेती एमेली मॉरिस्मो हिला 6,25,000 डॉलरचे बक्षीस मिळाले होते. ही रक्कम त्यावेळच्या पुरुष विजेत्या रॉजर फेडररच्या रकमेच्या 95% होती. या वेळीही सर्व सूचनांचे विश्लेषण करून आम्ही बक्षिसात समानता आणण्याचा निर्णय घेतला आहे.”

अर्थात, हा निर्णयही सहज झालेला नव्हता. जेव्हा बक्षिसातील लिंगसमानतेचं वारं वाहत होतं, तेव्हा ऑल इंग्लंड क्लब आपल्या तर्कावर ठाम होता. त्यांचं एकच म्हणणं होतं, की पुरुषांचे सामने साधारणपणे दीर्घ असतात. 2006 मध्ये फेडररने विजेतेपदाच्या मार्गात 202 गेम जिंकले होते. या उलट मॉरिस्मोने फक्त 142 गेम जिंकले होते. यातही पुरुषांचे बेस्ट ऑफ फाइव्ह सेट असतात, तर महिलांना फक्त बेस्ट ऑफ थ्री सेट खेळावे लागतात.

1999 मध्ये क्लबचे तत्कालीन अध्यक्ष जॉन करी यांनी सांगितले होते, की “जे नियमित स्पर्धा पाहतात, त्या लोकांचं आम्ही सर्वेक्षण करीत आहोत. गेल्या 10 वर्षांत तीन सर्वेक्षणांमध्ये 70 टक्के लोकांचं म्हणणं आहे, की आम्हाला पुरुषांचे एकेरीतला सामना पाहायला आवडतं. महिलांना मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, समान वेतनाची मागणी माझ्या मते विम्बल्डनसाठी हानिकारक आहे. त्याचं तात्पर्य असं नाही, की आम्ही त्यांच्यासोबत चुकीचं वर्तन करीत आहोत. तसे अजिबातच नाही. माझ्या मते, विम्बल्डन खेळण्याचा आनंद घ्या आणि बक्षिसाची रक्कम त्यांच्या उत्पन्नाचा एक लहानचा भाग आहे.”

Referance

Football

World Cup Prize Money

Boost Womens

an equal pay

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!