All SportsCricketsports news
टी-२० वर्ल्डकप रद्द करण्याबाबत संगकाराला काय वाटते?
30 May 2020
cricket-sangakkara-world-cup
कोरोना महामारीमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशातच टी-२० विश्वकरंडक T-20 world cup | क्रिकेट स्पर्धाही रद्द करण्याबाबत मतमतांतरे व्यक्त होत आहेत. मात्र, श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा kumar sangakkara | यांना वाटते, की यंदा टी-२० वर्ल्डकप रद्द करणे हा एक पर्याय आहे. कारण कोरोना महामारीशी coronavirus-cricket | संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.
जे काही सध्या सुरू आहे, त्यावर फक्त लक्ष ठेवणे एवढेच आपल्या हातात आहे, असे प्रतिष्ठित मेरिलबोन क्रिकेट क्लबचे (एमसीसी) marylebone cricket club | अध्यक्ष संगकारा यांनी म्हंटले आहे. ऑस्ट्रेलियात २८ मे रोजी झालेल्या आयसीसीची ICC | बैठकीत या स्पर्धेबाबतचा निर्णय १० जूनपर्यंत पुढे ढकलला आहे.
श्रीलंकेच्या या माजी कर्णधाराने सांगितले, ‘‘रोज नव्या गोष्टी शिकण्यास आणि पाहण्यास मिळत आहेत. त्यासाठी आपण वाट पाहायला हवी. एक पर्याय हा आहे, यंदा टी-20 वर्ल्डकप रद्द करावी. आपल्याला यापुढील प्रक्रियांवर लक्ष ठेवायला हवे, जेथे खेळाडू आणि प्रेक्षकांचं आरोग्य आणि सुरक्षा निश्चित असेल.’’
संगकारा म्हणाला, की या महामारीशी निगडित अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. ‘‘मूळ मुद्दा हा आहे, की कोरोनासह राहिले तर काय होईल? का हा ‘सार्स’ आणि ‘मर्स’सारखा गायब होत आहे की हा बदलत्या वातावरणासारखा पुन्हा येईल? आपल्याला कोरोनासोबत राहावे लागेल? मला नाही वाटत, की आता कोणाकडे या प्रश्नांची उत्तरे असतील. कालानुरूप ही स्थिती अधिक स्पष्ट होईल.’’