ख्रिस गेलचे आव्हानात्मक असे हे आठ विक्रम

 • आयपीएलच्या चार स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकारांचे विक्रम

  ख्रिस गेलने त्याने 2011 (44 षटकार), 2012 (59), 2013 (51) आणि 2015 (38) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून (आरसीबी) खेळताना हा विक्रम नोंदवला आहे.
 • सर्वाधिक विक्रमी धावांचा विक्रम

  विंडीजच्या या डावखुऱ्या फलंदाजाने 2013 मध्ये आरसीबीकडून खेळताना पुणे वारिअर्सविरुद्ध नाबाद 175 धावांची विक्रमी खेळी रचली. ही दीडशतकी खेळी 17 षटकारांनी सजलेली होती. हादेखील एक विक्रम आहे
 • कारकिर्दीत टी 20 मध्ये सर्वाधिक धावा

  गेलने टी 20 मध्ये सर्वाधिक 13,296 धावा केल्या आहेत. हा विक्रम गेलच्या नावार अद्याप आहे.
 • सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम

  गेलने सर्वाधिक अर्धशतके 82 अर्धशतके टी-20 क्रिकेटमध्ये नोंदवली आहेत.
 • सर्वांत जलद शतक

  षटकारांचा बादशाह गेलने टी 20 मध्ये सर्वांत जलद शतक नोंदवले आहे. त्याने ही विक्रमी कामगिरी अवघ्या 30 चेंडूंत नोंदवली.
 • एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा

  एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही गेलच्याच नावावर आहे. त्याने 2015 मध्ये 1,665 धावांचा रतीब घातला आहे.
 • सर्वाधिक सामनावीर

  टी 20 मध्ये सर्वाधिक सामनावीराचा बहुमानही गेलने मिळवला आहे. त्याला 58 सामन्यांत सामनावीर बहुमानाने गौरविण्यात आले आहे.
 • चौकार आणि षटकारांनी सजलेल्या सर्वाधिक धावा

  गेलने चौकार आणि षटकारांच्या मदतीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. पुणे वॉरिअर्सविरुद्ध त्याने केवळ चौकार, षटकारांच्या मदतीने 154 धावा केल्या.
Embed iList - kheliyad