अर्जेंटिनाच्या सहा रग्बी खेळाडूंना करोना
करोना महामारीचा फटका अर्जेंटिनाच्या रग्बीला बसला आहे. Argentina rugby coronavirus | अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय रग्बी संघातील सहा खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अर्जेंटिनाच्या रग्बी संघाने ही माहिती दिली.
Argentina rugby coronavirus | या खेळाडूंना करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तूर्तास या खेळाडूंना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
संक्रमण कमी करण्यासाठी आणि बायो बबल तयार करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती. त्यात सहा खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले.
यामुळे चार देशांच्या रग्बी चॅम्पियनशिपवर संकटाचे मळभ दाटले आहे. या स्पर्धेत अर्जेंटिनासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.